कोरोची सह पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात खुलेआम राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू असून पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कोरोची लोकमान्य नगर येथील सुयोग लॉज गेली पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव करून बंद करण्याचे आवाहन केले आहे.
पण हॉटेलच्या परिसरात वेश्या व्यवसायासाठी बसणाऱ्या महिला नील तारा चौक, साईनाथ वे ब्रिज, तसेच पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात असणाऱ्या चायनीज गाडे, चहाची टपरी, – पान टपरी अशा ठिकाणी त्या महिलांनी आपला अड्डाच बनवला असुन दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ग्राहकांना त्या ठिकाणी बोलावून खुलेआमरीत्या वेश्याव्यवसाय सुरू केला आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना व महिलावर्ग आणि व्यावसायिकांना बसत असुन याकडे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष घालून सदरचा वेश्याव्यवसाय बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.