कौटुंबिक वादातून पतीने रागाच्याभरात पत्नीच्या डोक्यात खोऱ्याने मारून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः पतीने शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, २२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कटफळ (ता.सांगोला) येथे उघडकीस आली.
मंडाबाई श्रीमंत मिसाळ (वय ५४), श्रीमंत मारूती मिसाळ (वय ५८, रा. कटफळ ता. सांगोला) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.कौटुंबिक वादातून पती श्रीमंत मिसाळ याने पत्नी मंडाबाई मिसाळ घरी झोपल्याअसताना खोऱ्याचा तुंबा डोक्यात मारून पत्नीचा खून केला व स्वतः पतीने ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतातील सुबाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान शेजारील नागरिक सकाळी विहिरीवर अंघोळीसाठी आल्यानंतर बाभळीच्या झाडाला श्रीमंत मिसाळ याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने ही घटना उघडकीस आल्याचे समजते. याबाबत मृताचे भाऊ पोलीस पाटील
येथील सार्वजनिक रस्त्यावर तरुण मृतावस्थेत आढळला. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. राजकुमार आनंददैया स्वामी (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. सेटलमेंट कॉलनी चार भागात मुळे नावाच्या व्यक्तीचे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील रस्त्यावर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तरुण निपचित रस्त्यावर पडल्याचे दिसून आला. त्याला सलगरवस्ती पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले असता, तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
