आटपाडीत नवे नाट्यगृह, सर्वांना लागली प्रतीक्षा….. 

आटपाडी तालुक्यात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यांनी आटपाडी, खानापूर, विटा या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे अनेक समस्या मार्गी लावण्याचे काम केले आहे. त्यांनी जनतेच्या हिताच्या अनेक योजना मंजूर करून आणलेल्या आहेत. स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून आटपाडी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या नावे भव्य नाट्यगृह उभारण्याचे काम सुरु आहे. यामध्ये त्यांच्या साहित्यांची ओळख होणारे ग्रंथसंपदा व साहित्य पाहायला मिळणार आहे. या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. सर्वांना याची प्रतीक्षा लागलेली आहे.