इस्लामपुरातील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा कलशारोहण थाटामाटात संपन्न….

इस्लामपूर येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक विधीसह उत्साहात संपन्न झाला. यावेळी इस्लामपूर येथील सर्व ग्रामस्थ व माने देशमुख परिवार एकत्र येऊन हा सोहळा पार पाडण्यात आला. धार्मिक विधीसह श्री सिद्धनाथ जोगेश्वरी च्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण करण्यात आले. यावेळी मंदिरास आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले होते.

धार्मिक विधीनंतर महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आलेले होते आणि या कार्यक्रमास हजारो भाविकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता.या कार्यक्रमास गावातील माहेरवासिनी, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांना गावच्या वतीने साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 30 वर्षानंतर गावांमध्ये ग्रामदैवत व कुलस्वामिनी मंदिराचा कार्यक्रम पार पडल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद व प्रसन्नतेची भावना दिसून येत होती.