मंत्री नितेश राणे सांगली दौऱ्यावर आले होते. आटपाडीत प्रथमच आटपाडीचा राजा गणेश मंडळाने या वर्षी स्थापना केली.आटपाडी तालुक्याच्या विविध विकास कामांचा आढावा यावेळी मंत्री नितेश राणे यांच्याकडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांनी सांगलीत दिला. जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांनी सांगली जिल्ह्यात युवकांचे संघटन करून पक्ष वाढीचे काम केले आहे. विविध उपक्रमांत ते सक्रीय सहभाग नोंदवितात. मंत्री नितेश राणे सांगली दौऱ्यावर शुक्रवारी असताना त्यांचे स्वागत करून आटपाडी शहरात येण्याचे आमंत्रण त्यांनी दिले आहे. यावेळी मंत्री नितेश राणे यांना आटपाडीचा राजाची प्रतिमा देऊन सन्मान करून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कार्यकत्यांनी भेट देण्याचे निमंत्रण दिले.
