आटपाडी तालुक्यात अनेक साहित्यिकांचे स्मारके आहेत. तालुक्याला साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तब्बल पाच वेळा अध्यक्षपद भूषविलेल्या आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांच्या स्मारकांची उपेक्षा शासनदरबारी सुरूच आहे.
तालुक्याने आतापर्यंत भवानराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना. सं. इनामदार यांच्या रूपाने संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. गदिमांच्या जन्मगावी शेटफळे येथे त्यांचे गेल्या दहा वर्षांपूर्वी स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र, हे स्मारक अद्याप अपूर्णावस्थेत आहे. अपूर्ण कामामुळे स्मारकाची दुरवस्था झाली आहे. शकरराव खरात यांच्या स्मारकाबाबतीतही शासन उदासीन आहे.