खळबळजनक! महिला शिक्षिकेला बुटाने मारण्याची धमकी! मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल

नगरपालिका शाळेतील मुलास तुम्ही अपशब्द वापरुन का बोलला ? असे एका शिक्षिकेने विचारल्याच्या कारणावरुन बुटाने मारण्याची धमकी देवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक सतिश नारायण आवताडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी या नगरपालिका कन्या शाळा नं.२ मध्ये शिक्षिका असून इयत्ता तिसरील विद्यार्थी चिखलामध्ये पाय भरवून वर्गामध्ये येत असताना फिर्यादीने त्यास पाय धू असे सांगितले असता

त्याने त्याचे वर्गातील बाटलीतील पाण्याने पाय धूतला मात्र तो स्वच्छ न झाल्याने जवळ असलेल्या नगरपालिका शाळा नं. १ मध्ये त्याने हौदावर जावून पाय धुतले.सदरचा प्रकार नगरपालिका मुलींची शाळा नं. १ चे प्रभारी मुख्याध्यापक सतिश नारायण आवताडे यांनी पाहिला व शाळेच्या बाहेर येवून त्या विदयार्थ्यास बोलावून दर्डावत तु तुझ्या शिक्षकाच्या मांडीवर बसून पाय धूवून घे असे अर्वाच्च भाषेत म्हणत ते निघून गेले.

दि.१८ रोजी दुपारी २.४५ वाजता फिर्यादी व सोबतचे शिक्षक निंगाप्पा कोळी, सुवर्णा आवताडे, भारती नागणे असे सर्वजण शाळेसमोर असताना आरोपीही तेथे होते.