कबनूरमधील वाहतूक कोंडीवर लवकरच केल्या जातील उपाययोजना ;आमदार डॉ. आवाडे

विधानसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी मतदारसंघातून डॉ. राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले आणि त्यांची आमदार पदी निवड झाली. त्यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर इचलकरंजी शहरातील तसेच परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केलेले आहे. तसेच अनेक विविध प्रकारच्या योजना मंजूर करून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अशातच कबनूरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न हा खूपच गंभीर बनलेला आहे. या गावातील नागरिकांनी मागील आठवड्यामध्ये शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना बाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी कबनूर चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी दिली आहे. ही बैठक विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्येच आमदार आवाडे यांनी ग्वाही दिलेली आहे.