सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात. सध्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील यात्रा कमिटीच्यावतीने यात्रेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान, यात्रा भरणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. बाहेरील व्यावसायिक यात्रेत व्यवसायासाठी येत असतात. यासाठी आतापासूनच योग्य नियोजन सुरु करण्यात आले आहे. कर्मणुकीच्या खेळांचे पाळणे यासाठी यात्रा कमिटीकडून जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. या जागेचा जाहीर लिलाव करण्यात येतो.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामदैवत मारुती मंदिर येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या लिलावात फक्त पाळणाधारकांनाच भाग घेता येणार आहे. लिलावानंतर ग्रामपंचायतीकडून जागा व सर्व नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.