कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे मा. प्रतिक पाटील यांचे आश्वासन! इंटकची वार्षिक सभा संपन्न!

इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखाना हा जगजाहीर आहेच. या कारखान्याची यशस्वी वाटचाल हि सुरूच आहे. राजारामनगर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) ची वार्षिक सभा आयोजित करण्यात आलेली होती. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्यामुळे परिसराची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नती झाली आहे. कारखानदारी यशस्वी करण्यामध्ये कामगारांचे मोलाचे योगदान आहे. या कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले 
यांनी केले.
राजारामनगर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) च्या वार्षिक सभेत ते बोलत होते. सभेत नवीन कार्यकारी मंडळाच्या निवडीसह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. भोसले म्हणाले, ३१ मार्च २०१४ रोजी साखर कामगारांच्या पगार वाढीच्या कराराची मुदत संपली आहे. परंतु सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. कायम कामगारांच्या जागेवर रोजंदारी, कंत्राटी कामगार घेतले जात आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.