RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! या पदासाठी भरती सुरु, अर्ज कुठे अन् कसा कराल?

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेने ज्युनिअर इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. रिझर्व्ह बँकेने या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. तुम्ही opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचून घ्यावी.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्युनिअर इंजिनियर सिविल आणि ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण ११ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल/इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी इंजिनियरिंग केलेल्या उमेदवारांची निवड मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

तर डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.रिझर्व्ह बँकेच्या या भरती मोहिमेत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३३,९०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेची ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२४ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.