सांगोल्यात शेतजमीन वाटेच्या कारणावरून पती-पत्नीची वृद्धास मारहाण, गुन्हा दाखल 

सध्या काहींना काही कारणावरून वादाला तोंड फुटत जाते. आणि मग त्याचे वाईट परिणाम देखील सहन करावे लागतात. खेडोपाड्यात तर अनेक शेतजमिनीच्या वाटणीवरून अनेक वादग्रस्त विधाने होतात आणि त्यानून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. सांगोला तालुक्यात शेतजमीन वाटेवरून चक्क पती पत्नीने वृद्धास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगोला शेत जमिनीत जाण्याच्या वाटेच्या कारणावरून चिडून शेजारील पती-पत्नी शेतकऱ्यांनी मिळून शिवीगाळ करीत एका वृध्दास खोऱ्याने डोक्यात हातावर, पायावर व पाठीवर मारहाण गंभीर जखमी केल्याची घटना नराळे (ता. सांगोला) येथे घडली. परशुराम कुदरे (वय ७२) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

पिर्यादी परशुराम अण्णाप्पा कुदरे (रा. नराळे) यांनी परशुराम कुदरे व शेजारील शेतकरी शिवाजी भोसले यांच्यात शेत जमिनीत जाण्यासाठी वाटेच्या कारणावरून बाद सुरु आहे. याच कारणावरून रविवारी दुपारी १२ वाजता फिर्यादी त्यांची जनावरे शेतातील विहिरीवर पाणी पाजत होते. त्यावेळी शिवाजी भोसले व त्याची पत्नी सुनीता भोसले यांनी तुला किती वेळा सांगितले आहे आमच्या शेतातून तुझी जनावरे घेऊन जायचं नाही म्हणून तरीही तू जनावरे का घेऊन गेला म्हणून शिवाजी भोसले यांनी त्याच्या हातातील खोऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात हातावर, पायावर व पाठीवर मारहाण करू लागला. यावेळी पत्नी सुनीताने केसाला धरून मारहाण केली. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी रंगनाथ भोसले, पंडित सावंत व लक्ष्मण बंडे यांनी त्यांच्या तावडीतून फिर्यादीची सोडवासोडव केली. याबाबत पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला असून तपास पोहेकॉ बजरंग बोराटे करीत आहेत. \