सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक कारणांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तुरीची रास सुरु असताना तूर भरण्यासाठी दुचाकीवरून पोती आणायला गेलेल्या अशोक आमगोंडा बिराजदार (वय ५०) यांचा मरवडे ते मंगळवेढा रोडवरील तळसंगी फाट्याजवळ अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला कारने (एमएच १०, डीटी ५५८१) जोरात धडक दिली.
त्यात गंभीर जखमी अशोक बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृताचा पुतण्या अमोल बिराजदार यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून कारचालक विशाल रामचंद्र बालगाव (रा. उमदी, ता. जत, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हवालदार वाघमोडे तपास करीत आहेत.