विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच शहाजीबापू पाटलांनी थेट पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीतील आटपाडी दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सांगलीतील विटा शहरात जाहीर सभा पार पडली. या सभेत शहाजीबापू पाटील बोलत होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्रिपदावरुन अनेकांचे पोस्टर बॅनर झळकत आहेत, मात्र, राज्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीजवळ जायचं आणि तिथलं धनुष्यबाण बटन दाबलं की मशीन वाजणार आणि पुन्हा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलायं.
तसेच आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहीणींना पैसे मिळाले असते का? गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्यांची वीजबिले माफ झाली असतील का? उपरोधिक सवाल शहाजीबापू पाटलांनी संबोधित करताना जनतेला केला आहे.