सध्या अनेक ग्रामपंचायतीची थकबाकी वसुली सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करत नाहीत म्हणजेच वेळेवर पाणीपट्टी घरपट्टी घरफाळा भरत नाहीत त्यामुळे मग मात्र ग्रामपंचायतींना पुढचे पाऊल उचलावे लागते. सध्या कुंभोज येथे थकबाकी वसुलीचे काम जोरात सुरु आहे. कुंभोज येथील ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढल्यामुळे हा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परीणाम
झाला आहे. त्यामुळे सरपंच स्मिता नू चौगुले आक्रमक झाल्या असून थकबाकी न भरल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी ग्रामसेवकांना सुचनाही केल्या आहेत.
कुंभोज येथे थकबाकी भरण्याचे आवाहन अन्यथा कठोर कारवाईचा इशारा
