अग्निवीर वायु भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी सुरु

अलीकडे सरकारी नोकरीसाठी प्रत्येक तरुणाची धडपड असतेच. त्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न देखील करीत असतात. भारतीय वायुसेनेमध्ये ०१/२०२६ च्या बॅचसाठी अग्निवीर वायु (पुरुष आणि महिला) च्या आगामी भरतीसाठी अधिसुचना प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून २७ जानेवारी २०२५ पर्यंत उपलब्ध असणार आहे. https://agnipathvayu.cdac.in या संकेत स्थळावर नोंदणी करावयाची असून कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.