इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट……

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी मध्ये नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पंचगंगेचा उपसा कधी बंद तर कधी कृष्णा पाणी योजनेला सातत्याने गळती लागत असल्यामुळे इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी आलेले नाही त्यामुळे नागरिकांवरती पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे. शहरातील नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पंचगंगा नदीपात्रातील प्रवाह सध्या थांबला आहे आणि त्यामुळे पाण्याला काळपट रंगाचा कलर आला असून पंचगंगा नदी पात्र हे अत्यंत प्रदूषित झालेले आहे. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा बंद केल्याने शहरवासीयांना मग पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पंचगंगा नदीचे जलप्रदूषण आणि शहरवासीयांना पाण्याची टंचाई इचलकरंजी शहरांमध्ये दिसून येत आहे. या सर्वांचाच नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव पडत आहे. यासाठी नदी कायमस्वरूपी प्रवाहित ठेवणे खूपच गरजेचे आहे आणि त्यावर उपाययोजना करणे खूपच गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.