दुष्काळी भाग म्हणून अनेक गावे प्रसिद्ध आहेत. पण अलीकडच्या काळात दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर असणाऱ्या गावांनी कायापालट केला आहे. याचे उदाहरण म्हणजे जत भाग. जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज समता नगर या शाळेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते नूतन वसुतिगृह व स्मर्णिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, जतचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी म्हैसाळ योजनेला चार टिएमसी पाणी उपलब्ध करून दिले. येत्या चार वर्षांत जतचा दुष्काळ कायमचा संपेल अशी अशा आहे. कामे वेगाने सुरू आहेत. जतमध्ये एमआयडीसी उभी राहणार आहे. उद्योग सुरु करणे कठीण आहे. कोणता उद्योग येणार हे पहावे लागेल आम्ही विकास कामे करतच राहणार आहोत. यापुढे राजकारण करणे आवघड आहे.
गरीबांनी राजकारण करावे इतके सोपी परिस्थिती आज नाही. शिक्षण संस्थेच्या समता आश्रम शाळेचा पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यानी अभिनंदन केले. दुष्काळी भागात शिक्षण संस्था उभी करून ती चालवणे सोपे नाही उमदी सारख्या अत्यंत दुष्काळी माळावर सर्वोदय शिक्षण संस्था सुरु केली त्याचा वटवृक्ष आज होतोय ५० वर्षे पूर्ण केलेल्या शाखेचा वर्धापन साजरा होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.