डायलिसिस विभाग आष्टा ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्याची मागणी…..

सध्या सरकारकडून अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत जेणेकरून त्याचा सर्वसामान्य जनतेला पुरेपूर लाभ प्राप्त होईल. सध्या विकासकामांचा आमदारांनी, अनेक नेतेमंडळींनी धडाका देखील सूरु केला आहे. आष्टा शहर हे झपाट्याने वाढत आहे. शहराच्या परिसरात अनेक छोटी मोठी गावे आहेत. रुग्णांची संख्या ही मोठी आहे. अनेक वर्ष ग्रामीण रुग्णालय चांगली सेवा देत आहे. वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने रुग्णालय परिसरात एक नव्याने इमारत उभी केली आहे. अलीकडच्या काळात डायलिसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

या रुग्णांना उपचारासाठी सांगली अथवा कोल्हापूर या ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून आर्थिक फटकाही बसत आहे. अनेक कुटुंबांना डायलिसिसचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे शासनाने आष्टा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू करण्याची आवश्यकता आहे. गेली अनेक वर्ष या ठिकाणी डायलिसिस विभाग सुरू व्हावा, अशी मागणी होत आहे. शासनाने या परिसरातील नागरिकांच्या मागणीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच अनेक रुग्णांना सोनोग्राफी गरजेची बाब बनली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये बाब बनली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये सोनोग्राफी विभाग सुरू आहे.

मात्र या ठिकाणी मनमानी रक्कम घेतली जाते. सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला अथवा महिलांना सोनोग्राफी करणे मुश्किल बनू लागले आहे. याचा विचार करून शासनाने आष्टा ग्रामीण रुग्णालयात अल्प दरात सोनोग्राफी विभाग सुरू करावा, अशी मागणीही निशिकांत दादा थ फाऊंडेशन आणि भाजपा युवा मोर्चाचे
वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.