हातकणंगलेतील रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकीकरणाला गती

सध्या अनेक भागांमध्ये विकास कामांचा धडाका सुरू झालेला आहे. अनेक नेते मंडळींची निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच अनेक सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून होत आहे. सध्या रेल्वे स्थानक सुधारण्याच्या यादीमध्ये हातकणंगले स्थानकाचा समावेश झाल्यानंतर हातकणंगले येथील विकास कामांना गती आलेली आहे. सध्या प्लॅटफॉर्मवरील शेडची लांबी वाढविण्याचे काम गतीने सुरू असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवरती स्टाइल्स बसवणे, विद्युतीकरण, स्वागत कमान ही कामे देखील गतीने सुरू आहेत. एकूणच हातकणंगले येथील रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकीकरणाला गती आल्याचे चित्र दिसत आहे