इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यापाठीमागे अनेक नेतेमंडळींचे योगदान लाभलेले असतेच. कांजारभाट, कोल्हाटी, मराठा मुस्लिम आधी जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणार लाभ बंद झाला होता. हा वारसा हक्क मिळावा यासाठी मागणी जोर धरत होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे सर्व जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना आता वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे. या कामात तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील माने यांनी विशेष लक्ष घातले होते.
या कामात शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी गेल्या आठ वर्षापासून सतत शासन दरबारी पाठपुरावा केला होता शिवाय संभाजीनगर खंडपीठातील या दाव्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.त्यामुळे रवींद्र माने आणि रवी रजपुते यांचा पात्र सर्व जातीतील लाभार्थींतर्फे आज सत्कार करण्यात आला.
याबाबत सतत पालिका कर्मचाऱ्यांसाठी लढणारे शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने म्हणाले की, सर्व जातीतील म्हणजे कांजारभाट, कोल्हाटी, मराठा मुस्लिम आधी जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणार लाभ बंद झाला होता. त्यामुळे शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढून सर्व जातीतील कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ दिला. मात्र त्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्याने न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती असे स्पष्ट करून रवी माने म्हणाले की, ही स्थगिती उठवण्यासाठी मी स्वतः आणि रवी रजपुते यांनी प्रयत्न केले. शिवाय तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण जोर लावला होता.
आता उच्च न्यायालयाने ही स्थगिती आज कुठवल्यामुळे सर्व जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिवाय येत्या आठवड्याभरात त्याबाबत सुधारित शासन निर्णय जारी होणार आहे असे माने यांनी स्पष्ट केले.