रेशनकार्डची ‘ही’ सेवा होणार बंद! लवकरच राज्यात येणार ई-रेशन कार्ड…..

रेशनकार्ड धारणांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आता नव्याने जर रेशनकार्ड काढायचे झाल्यास रेशनकार्डधारकांना ते प्रिंट स्वरुपात येथून पुढच्या काळात मिळणार नाही. कारण आता रेशनकार्डची छपाई बंद करण्यात आली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात रेशनकार्ड मिळणार नसून त्याला पर्याय म्हणून ई-रेशन कार्ड वापरता येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे जुने रेशनकार्ड आहे, ते देखील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वैध ठरणार आहे. याबाबत नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी एका वहिनीला माहिती दिली आहे.

राज्यातील रेशनकार्ड धारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पिपळे, पांढरे आणि केसरी या रंगाचे कार्ड संबंधित रेशनकार्डधारकाला दिले जाते. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही कार्ड यापुढे मिळणार नसून ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे. रेशनकार्डवर लाभार्थ्याला माल वितरित केल्यानंतर त्याची नोंद रेशनकार्डवर केली जात होती. त्यानंतर आता रेशनकार्डला आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिणामी सर्व नोंदी या त्या माध्यमातून ठेवल्या जात आहेत. यामुळे प्रिंट स्वरुपात असलेले रेशनकार्डची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.

ई-रेशनकार्डवर नोंदी कशा होणार

आपल्याकडे उत्पन्नानुसार रेशनकार्डचे वर्गीकरण केलेले आहे. द्रारिद्र रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशनकार्ड, सामान्य कुटुबांतील अंत्योदय लाभार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्या सक्षम असणाऱ्यांना पांढऱ्या रंगाचे रेशनकार्ड दिले जाते. परंतु, ई-रेशनकार्डमध्ये देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे. राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत, त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई-रेशन कार्ड अस्तित्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.