हातकणंगले तालुक्यातील प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी पासून तहसील कार्यालय हातकणंगले समोर होणार आहे.
या अगोदर आम्ही 5 फेब्रुवारी 2024 रोजी हातकणंगले तहसीलदार यांना प्रलंबित कुणबी दाखल्या संदर्भात निवेदन देऊन 20 फेब्रुवारी 2024 रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पण तरी तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सदर आंदोलन आज पासून बेमुदत करत आहोत असे मराठा बांधवांनी सांगितले. तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहून मराठा आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.