बारामती 8 वर्षीय मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अजित पवार संतापले

बारामतीमध्ये जर कुणी कायदा सुव्यवस्था राखणार नसेल तर त्याला योग्य तो धडा शिकवा, बारामतीची बदनामी आजिबात खपवून घेणार नाही असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलाय. यूपी-बिहारमधून कुणीतरी येतो, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करतो, ती मुलगीही यूपीचीच असते. यातून शेवटी बारामतीची बदनामी होते, असल्यांचा कायमचा बंदोबस्त करा असे निर्देश अजित पवारांनी पोलिसांना दिले आहेत.

बारामतीत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकात 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहेत. यावेळी केलेल्या भाषणामध्ये अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी बारामतीत 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, या घटनेसंदर्भात अजित पवार संतापलेत. ते म्हणाले की, आठ वर्षाच्या मुलीवर ती पण यूपीचीच, तिच्यावर एकाने बलात्कार केला. शेवटी बारामतीची बदनामी होणार. असल्याना सोडू नका, त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.”

बारामतीतील टवाळक्या करणाऱ्या तरुणांना दम देत अजित पवार पुढे म्हणालेत की, कुणी कुठेतरी लाईन मारायला जाल तर तुझी लाईनच काढतो अन् टायर खाली घेतो. कुणालाही अजिबात कोणाला सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे.”