आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव सर्वांच्याच परिचयाचा आहे. आटपाडी तालुक्यातील ब्रिटीशकालीन राजेवाडी तलावामध्ये एक ४० ते ४५ वयोगटातील इसम पाण्यात बुडुन मयत झाल्याची घटना शुक्रवारी पोलिस पाटील यांनी आटपाडी पोलिसांना दिली. याबाबत आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मयत व्यक्तीला विचारपूस केली असता अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. राजेवाडी पासून तलाव अंतर जास्त असल्यामुळे शेतकरी शेतीसाठी पाण्याच्या मोटारी सुरू करण्यासाठी जाताच सदर व्यक्ती मयत अवस्थेत आढळून आली.
स्थानिक नागरिकांनी गावचे पोलिस पाटील सचिन हेगडे यांना याबाबत सांगितले असता त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सदर व्यक्तीचे आटपाडी शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पोलिस हवालदार एन. व्ही. गवंड करीत आहेत. याबाबत राजेवाडी गावचे पोलिस पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे.