‘सरपंच ते आमदार’ की मिळवण्यापर्यंतचा आमदार अनिल बाबर यांचा प्रवास……

अनिल बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाते. अनिल बाबर हे खूप मोठे राजकारणी नेते होते. त्यांचे आज आकस्मिक निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. १९७२ साली वयाच्या २२ वर्षी त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले.जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. १९९० मध्ये सगळ्यात आधी ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर १९८२ ते १९९० या वर्षात खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष ,म्हणून काम केली. नंतर १९९९ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून जिंकून आले.त्यानंतर त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. आमदार एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. पश्चिम महाराष्ट्र्रात त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जायचे.

अनिल बाबर हे १९७२ साली सांगली झेड पी सदस्य होते.नंतर १९८१ साली ते बांधकाम विभाग सभापती झाले. १९९० मध्ये खानापूर पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून निवडून आले होते.१९९० मध्ये सगळ्यात आधी ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.अनिल बाबर टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख गेले.

त्यांनी सलग २० वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद सांभाळले आहे.त्यानंतर ते २०१४ व २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सोबत चांगली ओळख झाली होती.२०२४ मध्ये अनिल बाबर भाजपच्या तिकिटांवर लढणार होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा अनिल बाबर यांचा असा प्रवास होता. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनिल बाबर यांची सगळीकडे ओळख होती. अनिल बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जायचे.