भवानी मळा पाणंद रस्ता लवकर करण्याची नागरिकांबरोबर शेतकऱ्यांची मागणी….

अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. तर काही भागात नवीन रस्त्यांची मागणी नागरिकांकडून होत आहे.  दिघंची पासून तीन ते चार किमी अंतरावर भवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. वर्षभर हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीच्या दर्शनाला येणारे भाविक भवानी पांध या नावाने असणाऱ्या पांधीने ये-जा करत होते परंतु याच पांधीला आता झुडपाने विळखा घातल्यामुळे दिघंची पासून १ ते २ किमी अंतरावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिराला सुमारे ५ ते ६ किमी अंतरावरून वळसा मारून यावे लागत आहे.

भवानी व यमाई या दोन्ही मंदिराकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. चिलारीने विळखा घातल्यामुळे भाविकांना चिलारीतून रस्ता शोधत जावे लागते. या पांधीलगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चिखलातन जावे लागते. दोन ते तीन महिने यात पाणी साचून राहते. श्रावण महिन्यात दोन्ही देवीच्या दर्शनाला भाविक येत असतात. परंतु मंदिराला येणाऱ्या मार्गाला चिलारीने विळखा घातल्याने लोकांना लांबून पायपीट करावी लागते.

माणगंगा नदीकडे जाणारा हा पाणंद रस्ता आहे. माणगंगा नदीकाठी स्मशानभूमी आहे, परंतु याठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथील स्मशानभूमी सुद्धा चिलारीच्या विळख्यातच सापडली आहे त्यामुळे भवानी पाणंद रस्ता त्वरित करावा अशी मागणी होत आहे. भवानी मळा पांढरेवाडी येथील भवानी पांध नावाने प्रसिद्ध असणाऱ्या पांधीचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून चिलारीच्या विळख्यात सापडलेला आहे. भवानी मंदिरापासून माणगंगा नदीपर्यंत हा रस्ता येतो या पाणंद रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रस्ता सुरु करावा अशी येथील नागरिकांबरोबर शेतकऱ्यांची मागणी आहे.