टेंभू योजनेला क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार; आ. गोपीचंद पडळकर

जत विधानसभा मतदारसंघामधून आमदार गोपीचंद पडळकर हे निवडून आल्याबद्दल त्यांचा आटपाडी येथे नागरी सत्कार कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकांवर टीकास्त्र सोडले. पडळकर म्हणाले, आता संघर्ष संपला सर्वसामान्य माणसाला विविध पदावर बसवायचे आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर जनतेने भरभरून प्रेम दिलेले आहे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. तसेच कार्यकर्त्यांनी देखील नाराज होऊ नका. मंत्रिपदापेक्षा आपले नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत यातच सगळे आले.

यापुढे जत व खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शेती, पाणी आणि उद्योग यावर मी काम करणार आहे. सत्तेचा वापर विकासाला चालना देण्यासाठी करणार आहे. तसेच खानापूरच्या दुष्काळाला संपवणाऱ्या टेंभू योजनेला क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नाव देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.