दिघंची (ता. आटपाडी) येथील तालुका क्रीडा संकुल अतिक्रमण काढावे याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य अविनाश रणदिवे यांच्यासह दिघंची ग्रामस्थांनी सांगलीच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिघंची येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानास चिकटून असणारे माजी सैनिक यांनी शासनाने दिलेल्या जागेपेक्षा मागील बाजूस अतिक्रमण केलेले दिसून आले आहे.
याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही दाद दिली नाही असेच जरअतिक्रमण राहिले तर अजून संपूर्ण मैदानावर अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याने अतिक्रमण वेळीच थांबवावे तसेच झालेले अतिक्रमण त्वरित काढावे, अशी मागणी केली आहे .निवेदनावर अविनाश रणदिवे, मारुती भोसले, विलास देशमुख, सोमनाथ पांढरे, अमोल जावीर, शहाजी यादव, सोपान काळे, प्रशांत शिंदे, सचिन ढोक, संतोष त्रिगुणे, विकास मोरे, ऋतुराज देशमुख, सुशांत ढोले, रोहित पिसे, विकास ढोक, जगन्नाथ मोरे, राहुल चव्हाण, पिनू जवळे आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.