सोमवारपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर महासत्ता चौकात लाक्षणिक उपोषणाचा इशारा…..

इचलकरंजी शहरात अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे दिसतच आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जुनी सांगली वेस ते आंबेडकर पुतळा रस्ता हा कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्याकामी खुदाई केला होता. सदर रस्ता वर्दळीचा असून सदर रस्त्यावर पोलीस ठाणे, हॉस्पिटल, शाळा आहेत. तसेच बाह्य मार्ग असल्याने सदर रस्त्यावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते.

अनेक शाळांचे विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करत असतात. परंतु रस्त्यावर अनेक दिवसापासून खड्डे पडले आहेत. रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे केली होती. त्यावेळी उपायुक्त काटकर यांनी मक्तेदारास आदेश देऊन सदर रस्त्याचे काम त्वरित तरी सुरू करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. परंतु अद्याप रस्त्याच्या काम जात सुरुवात झाली नाही.

जुनी सांगली वेस ते आंबेडकर पुतळा रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विमानतळ सल्लागार समिती सदस्य मधुकर मुसळे यांनी म हापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर महासत्ता चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य बापसो मसले यांनी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांना  निवेदनाद्वारे दिला आहे.