इचलकरंजी वाहतूक शाखेनेही जप्त केलेे 36 वाहनांचे सायलेन्सर

सध्या वाहतुकीची कोंडी भरपूर होत आहेच त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन देखील होत असतानाचे चित्र पहायला मिळत आहे. कानठळ्या बसविणार्‍या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाच्या 737 सायलेन्सरवर शुक्रवारी दसरा चौकात रोडरोलर फिरला. अवघ्या काही मिनिटांत सायलेन्सरचा चक्काचूर झाला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे करवीरवासीयांनी मुक्तकंठाने कौतुक केले.नियमांचे उल्लंघन करणार्‍या सायलेन्सर विक्रेत्यांविरुद्धही पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी उपस्थितांमधून होत होती.

इचलकरंजी वाहतूक शाखेनेही 36 वाहनांचे सायलेन्सर जप्त केलेे. रात्री-अपरात्री शहरात मध्यवर्ती चौक, हॉस्पिटल परिसर, बस, रेल्वेस्थानक, धार्मिक परिसरासह नागरी वस्तीत फटाकेसद़ृश आवाजाने नागरिकांची झोपमोड करणार्‍या वाहनांचेही सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले होते. या सायलेन्सरवर मध्यवर्ती भरचौकात रोडरोलर फिरविण्याचे निर्देशही पोलिस अधीक्षकांनी दिले होते.