बॉलिवूडमधील जशी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा फार रंगते तशाच चर्चा स्पोर्टमधील खेळाडूंच्या खासगी आयुष्याबद्दी अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळते. यातच आता भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झाबद्दलही सध्या एक चर्चा तुफान व्हायरल होत आहे ती म्हणजे तिच्या डेटींगची.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात मोठा बदल झाला. सानियाला डिप्रेशनला सामोरं जावं लागलं असल्याचंही म्हटलं जातं. मात्र, ती या धक्क्यातून बाहेर आली. घटस्फोटानंतर अनेकदा तिचं नाव स्टार खेळाडूंसोबत जोडलं जातं होतं. जसं की सानिया मिर्झा आणि स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांचं नाव नेटकऱ्यांनी जोडलं होतं. पण सानियाने यावर कोणतही भाष्य करणं टाळलं आहे.
सोनियाच्या एका इन्टाग्राम स्टोरी तुफान व्हायरल झाली आहे. सानिया मिर्झा सोशल मीडियावर अॅक्टिव असते. सानिया मिर्झाने इंस्टाग्रामवर तिच्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढच नाही तर त्या व्यक्तिसोबत सतत डेटवर जायला आवडेलं असही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सानिया मिर्झाच्या मनात कोण आहे? याबाबत अनेक प्रश्न विचारले जात असतानाच तिची ही पोस्ट व्हायरल झाली.
खरंतर ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून फराह खान आहे. 9 जानेवारीला फराहचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सानियाने तिच्याबद्दल ही पोस्ट लिहिली होती. सानियाने या पोस्टमध्ये फराह खानचं कौतूक केलं अन् प्रत्येक वेळी तिच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. सानिया मिर्झाने फराह खानसोबतचा फोटो देखील पोस्ट केला होता.