वूमन्स टीम इंडिया मायदेशात आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना हा राजरोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सामन्यात नाणेफेक जिंकली. कर्णधार स्मृती मंधाना हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृतीचा बॅटिंगचा निर्णय सहकाऱ्यांनी योग्य ठरवला. जेमिमाह रॉड्रिग्स हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 370 धावा केल्या. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला.
जेमिमाहने 91 बॉलमध्ये 112.08 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या. जेमिमाहने या दरम्यान 12 चौकार ठोकले. जेमिमाहने या शतकासह 7 वर्षांची प्रतिक्षा संपवली. जेमिमाह रॉड्रिग्सच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. जेमिमाहने फेब्रुवारी 2018 मध्ये टी 20I तर 12 मार्च 2018 रोजी एकदिवसीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता 2025 मध्ये जेमिमाहने पहिलवहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं.
टीम इंडियाने 370 धावांसह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. महिला ब्रिगेडने याआधी विंडीज आणि आयर्लंडविरुद्ध वनडेत 358 धावा केल्या होत्या. वूमन्स टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 24 डिसेंबर 2024 रोजी 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या होत्या. तर आयर्लंडविरुद्ध 15 मे 2017 रोजी 2 विकेट्स गमावून 358 धावसंख्या उभारली होती. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला ही मालिकाही आपल्या नावावर करेल.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.
