आजचे राशीभविष्य! Today 13 January 2025 : आज भोगीचा दिवस सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस?

मेष

आज काही गोष्टी आतून करण्याची प्रेरणा येईल आणि ते काम करायला तुम्हाला आवडेल.

वृषभ

दुसऱ्याच्या मनातील भावना ताबडतोब ओळखाल. आवश्यक तेवढा पैसा मिळेल.

मिथुन

आज थोडे निवांत राहण्याचा मूड असेल. कष्ट खूप करावे लागले तर  मानसिक त्रास होईल. 

कर्क

कष्टाचा पैसा खरा, बाकी मार्गाने मिळालेला पैसा पचणार नाही, हे आज लक्षात ठेवा.

सिंह

आरोग्याच्या दृष्टीने प्रकृतीला जपायला हवे, काही रेंगाळणाऱ्या व्याधींवर उपचार करावे लागतील.

कन्या

आज नको त्यांचे पाय धरावे लागतील. कोणतेही धाडस करताना दहा वेळा विचार करा.

तूळ

महिलांचा तापटपणा वाढेल. परंतु तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी अचूक पार पाडाल.

वृश्चिक

तुमच्या हातून गुप्त गोष्ट कधीही दुसऱ्याला सांगितली जात नाही, याचा अनुभव घ्याल.

धनु

तरुण वर्ग त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्याकडे बोलतील. आज थोडे संवेदनशील बनाल.

मकर

क्षुल्लक गोष्टींनी निराश व्हायचे नाही हे ठरवून टाका. लोकांना सहकार्य करण्यात पुढे राहाल.

कुंभ

वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल. गायन-वादन कलेत उत्तम प्रगती होईल.

मीन

चांगल्या गोष्टींची खरेदी करून आनंद मिळवाल. आर्थिक स्थिती मनासारखी राहील.