चंदूर ग्रामदैवत श्री. महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

सध्या सर्वत्र यात्रा सुरु आहेत. शहरातून यात्रांसाठी लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. गावोगावी छोट्या मोठ्या यात्रा या सालाबादप्रमाणे भरतच असतात. अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. अनेक स्पर्धा घेतल्या जातात. सालाबादप्रमाणे याही वर्षी हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील ग्रामदैवत श्री. महासिद्ध देवाची यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी लहान मोठे पाळणे ब्रेक डान्ससह विक्रेत्यांची स्टॉल्स लावण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यात्रेतल्या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अस आवाहन सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच योगिता हळदे, ग्रामविकास अधिकारी बी. बी कांबळे यांनी केले आहे.

चंदुर ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती जवाहर साखर कारखान्याचे संचालक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, खेळ, मनोरंजन यासह विविध कार्यक्रमांचा आयोजन केले आहे. सोमवार दिनांक 13 जानेवारीपासून शुक्रवार दिनांक 17 जानेवारी अखेर पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचा आयोजन केले करण्यात आलेले आहे. बुधवारी म्हणजेच १५ जानेवारीला यात्रा आहे. मंगळवारी सायंकाळी सहा पासून श्रींच्या मूर्तीला दंडवत आणि पालखी सोहळा त्यानंतर रोज धार्मिक कार्यक्रम मंदिरात असणार आहेत.
रात्री आठ वाजता धमाका ऑर्केस्ट्रा कोल्हापुर हे आपली कला सादर करतील.

गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी आठ वाजता झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा, शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता खास महिलांसाठी विवेक आणि विना यांचा फेमस होम मिनिस्टर कार्यक्रम श्री महासिद्ध मंदिर कार्यालय चंदुर येथे होणार असून या मधील विजेत्यांना इलेक्ट्रिक वस्तू, पैठणी साड्या, सोन्या-चांदीचे दागिने, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र अशी आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत.

याचबरोबर यात्रेमधील स्वच्छता आणि सुविधा म्हणून गावासह दंडवत मार्गावरील रस्ते गटारी साफ करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली असून संपूर्ण यात्रा काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुचाकी चार चाकी वाहनांसाठी वेगळे पार्किंग व्यवस्था केलेली आहे. तरी ग्रामस्थांनी भाविकांनी यात्रेकरूंनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असा आवाहन सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच योगिता हळदे, ग्रामविकास अधिकारी बी. बी कांबळे यांनी केले आहे.