इचलकरंजी महापालिकेच्या प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची पालक म्हणून होणार नियुक्ती

अलीकडे प्रत्येक भागात अस्वछता हि पहायला मिळतेच. कितीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले तरीही असे काही नागरिक असतात कि ते परिसर स्वच्छ ठेवतच नाहीत त्यामुळे मग अनेक भागात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अलीकडच्या काळात इचलकरंजी शहरात देखील घाणीचे साम्राज्य पहायला मिळत आहे. इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी महापालिकेच्या मालकीच्या अनेक इम ारतीआहेत. त्यामध्ये शाळा, शॉपिंग
सेंटर, मंगल कार्यालय, दवाखाना, नाट्यगृह, जलतरण तलाव यांचा समावेश आहे. अशा एकूण ७० पेक्षा जास्त इमारती असून कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अशा इम रतीना कोणी वाली राहत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी तळीराम व तरुणांचे टोळके बसलेली असतात.

तळीराम व तरुणांच्या टोळक्यांकडून इमारतींची नासधूस होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. महापालिकेच्या अनेक इमारतींना दुरुस्ती व देखभाली अभावी अवकळा प्राप्त झाली आहे. अनेक इमारतींमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची मोडतोड करण्यात आलेली आहे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी महापालिकेच्या प्रत्येक इमारतीची संपूर्ण जबाबदारी एकेका अधिकाऱ्यावर देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्यावर त्या त्या इमारतीचे पालकत्व असणार आहे.

सदर अधिकाऱ्याने आपल्याला जबाबदारी दिलेल्या इमारतीची सद्यस्थितीचा अहवाल सादर करायचा असून सदर इमारती मधील असुविधा, स्वच्छता व देखभाल दुरुस्तीवर लक्ष ठेवून इमारती सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी असणार आहे, असे आयुक्त दिवटे यांनी सांगितले.