अलीकडे शेतकरी हे जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आहेत. पण अनेक वेळा शेतकरी हा आर्थिक अडचणींन मुळे हवालदिल होऊन तसेच वातावरणातील फरकामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीला कंटाळून जातो. त्यामुळे शेतीकडे तसेच दुग्ध व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे हे होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारत विकसित होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देशात केला जातोय. त्याचाच भाग म्हणून आम्ही सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची खते उसाची रोपे, बी बियाणे पुरवण्याचे काम आमच्या कारखान्याच्या वतीने करत आहोत आणि या कारखान्यावर कोणाचीही देणे नाही अथवा शासनाचे बँकांचे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही व असा शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणारा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना हा कारखान्यांचा रोल मॉडेल आहे.
तसेच शेतीला पूरक दूध व्यवसायात चार पैसे मिळण्यासाठी सहकार भारती संस्थेने अमूल दूध डेअरीसारखे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी सहकार्य नक्की करू असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी केले.
आमदार डॉ. राहुल आवाडे म्हणाले, देशात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यामुळे शेतकरी नागरिक तसेच उद्योजकांची अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये मोफत विज बिल व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार व दिलेला शब्द पाळणार अशी ग्वाही दिली.