खासदार विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य; एखाद्या वेळेस काँग्रेस सांगली महापालिका….

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागलेले आहे. काहींनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा हाती घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं.

इंडिया आघाडी ही दिल्लीत तयार झाली आहे.त्यामुळे दिल्लीत आघाडी राहिलं मात्र, एखाद्या महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही. एखाद्या वेळेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल, स्थानिक भावना ओळखून हा निर्णय घ्यावा लागतो असं मोठं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार आहेत असंही ते म्हणाले.

एखाद्या महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही. एखाद्या वेळेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल, स्थानिक भावना ओळखून हा निर्णय घ्यावा लागतो असे पाटील म्हणाले. मात्र, वरिष्ठ स्तरावर आघाडी कायम राहिल असेही ते म्हणाले. विधानसभेचा पराभव ज्या पद्धतीने झाला त्यामुळं आम्ही सर्व डिस्टर्ब आहोत. काही नेते वैयक्तिक भावना मांडत असतील ती पक्षाची मते नसतील. हा पराभव संयुक्तीक आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावं लागणारचं आहे.