सध्या प्रत्येक भागात विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नेतेमंडळी आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. जेवढा शक्य आहे तितका निधी ते शासनाकडून मंजूर करून आणत आहेत. ज्यामुळे अनेक भागाच्या विकासात भर देखील पडत आहे. इस्लामपूर शहरातील मध्यवर्ती असणारे नाट्यगृह हे दुरावस्थेत सध्या आहे. काही दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती असणारे नाट्यगृह दुरावस्थेत आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम या नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडत होते.
अलिकल्या काही काळात प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, मेकअप रूम तसेच छताचे सिलींग असे एकूणच बरेच काम करणे गरजेचे असून ते आता बंद अवस्थेत आहे. याच नाट्यगृहात प्रसिद्ध कलाकारांच्या नाटकांची मेजवानी शहरातील नाट्यप्रेमींनी अनुभवली आहे. पण सध्या हे नाट्यगृह बंद असल्यामुळे परीसरातील नाट्यप्रेमींच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नाट्यप्रेमी लोकांकडून सारखी मागणी होत आहे.
म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्याकडे एक खास बाब म्हणून लक्ष वेधून दुरुस्ती, नुतणीकरण, अत्याधुनिक प्रकाश व आवाज व्यवस्था,कलाकारांना विश्राम व मेकअप रुमची अत्याधुनिक व वातानुकूलित व्यवस्था अशा कामासाठी ५ कोटी रुपये एवढ्या भरीव निधी मिळावा व शहरातील नाट्यप्रेमी संस्था व नागरीकांच्या भावनेचा आदर करावा.
अशी शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी पत्राद्वारे मागणी केली. तर यावेळी खासदार धैर्यशील माने साहेब म्हणाले आपले नेते एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत. महायुतीचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत अजित दादा अर्थ मंत्री आहेत. आपण स्वतः लक्ष घालून या नाट्यगृहाच्या कामासाठी निधी मंजूर करून आणू आणि सर्व नाट्यप्रेमी जनतेच्या स्वप्नातील अत्याधुनिक असे नाट्यगृह त्यांच्या सेवेत उभारून दाखवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
