सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आमदारपदी निवड झाली. त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्य मिळाले. आमदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न देखील सुरु केलेला आहे. नवी मुंबई ( नेरूळ) येथे सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्यावतीने सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजयी मेळावा विद्यार्थी भवन संकुलात मंडळाचे प्रमुख सल्लागार रंगनाथ चोरमुले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष शामराव आलदर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय भाई आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्ते नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोल्याच्या गोरगरीब जनतेसाठी आबासाहेब यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम आयुष्यभर नैतिकता जपत समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच मी माझी आगामी वाटचाल करणार आहे. सांगोला विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळांनी विजयाबद्दल सत्कार केला त्यांचा त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही असे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले येणाऱ्या काळात गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यावर वर भर राहणार आहे. सांगोला मधील वाढती गुंडगिरी मोडीत काढायची आहे तसेच सांगोला सिंचन योजना कार्यान्वित करणे, सांगोला एमआयडीसी निर्माण करणे आदि कामांना प्राधान्य देणार असून येणाऱ्या काळात सर्वांनी एकत्र मिळून काम करायचे सर्वसामान्य जनतेच्या गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार राज्यात शेकाप वाढविण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागू असे आ देशमुख यांनी शेवटी सांगितले. नवी मुंबई नेरून येथे आ देशमुख यांचे आगमन
होताच फटाक्याच्या आतषबाजीत हलगीच्या निनादात आंबेडकर चौक नवी मुंबई ते पुणे विद्या भवन संकुल पर्यंत जिप्सी गाडीतून भव्य दिव्य मिरवणूक काढली मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होते सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग नोंदवला.