पश्चिम महाराष्ट्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे प्रत्येक पक्षाचे लक्ष लागलेले आहे. अनेकांनी स्वबळाचा नारा हाती घेतलेला आहे. अनेकांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी देखील चालू केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करायला आरंभ केला आहे.

येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शाखांची निर्मिती आणि काही जुने-नवे पदाधिकारी बदल  हे राजकीय खेळ ते खेळतील असे संकेत मंगळवारी दरे (जि. सातारा) येथून प्राप्त झाले. शिवसेना संघटन बांधणी करताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरुणांना अधिक संधी देणे, पक्ष नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपवणे यासाठी नवी राजकीय रणनिती त्यांच्याकडून आखली जाण्याची शक्यता मंगळवारी व्यक्त केली जात आहे.