Balanced Diet: उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असायला हवा? आरोग्य राहील चांगले आणि सुदृढ……

मित्रांनो जर तुम्हाला जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी अगोदर आपले आरोग्य चांगले, सदृढ असणे गरजेचे आहे. तेव्हाच साध्य करता येऊ शकते. तर आपले निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची आहारात काळजी घेणे गरजेचे तसेच आपल्या आरोग्यासाठी आहार कोणता फायदेशीर आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. तर आजच्या लेखात 2025 मध्ये आरोग्याला कसे प्राधान्य देता येईल? आणि यासाठी फूड किंवा सप्‍लीमेंट्सच्‍या माध्‍यमातून आहारसंदर्भातील तफावतींना कसे दूर करता येईल यांची माहिती जाणून घेऊया. आरोग्य उत्तम राखण्यासाठी संतुलित आहार कसा असायला हवा?
आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी आहार संतुलित असणे आणि त्‍यामध्‍ये विविध प्रकारचे आवश्‍यक पौष्टिक घटक असणे महत्त्वाचे आहे.

प्रोटीन
हे स्‍नायूचे बळ वाढवण्‍यास मदत करते, यासाठी आहारात डाळ (मसूर), चणे, राजमा, पनीर, अंडी व चिकन यांचा समावेश होतो.
कार्बोहायड्रेट्स: शरीराचे प्रमख ऊर्जा स्रोत असलेला हा पौष्टिक घटक असून, भात, चपाती, पोहा, ओट्स व रताळे यांमधून ते मिळते.

ओमेगा -3
ओमेगा -3 फॅटी अॅसिड्स हे हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास, तसेच दाह कमी करण्‍यास मदत करते. जे फ्लॅक्‍ससीड्स (अळशीच्या बिया), अक्रोड, मोहरीचे तेल आणि मासे यामध्‍ये आढळून येते.

फायबर
फायबर अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होण्यास फायदेशीर आहे. तसेच ते वजन नियंत्रित ठेवण्‍यास मदत करते. आपल्याला फायबर ब्राऊन राईस व मिलेट सारखी संपूर्ण धान्‍य, पेरू तसेच सफरचंद यांसारखी फळे, पालक व ब्रोकोली यांसारख्‍या भाज्‍या आणि सलिअम हस्‍क (इसाबगोल) यामधून मिळते.

व्हिटॅमिन्‍स
निरोगी आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्‍स देखील आवश्यक आहे, जसे की-

व्हिटॅमिन डी: जे हाडांच्‍या आरोग्‍यासाठी कॅल्शिअम शोषणामध्‍ये मदत करते, हे फोर्टिफाईड दूध, दही व सूर्यप्रकाशामधून आपल्याला मिळते.
व्हिटॅमिन ई: हे अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट म्‍हणून कार्य करते, पेशींचे नुकसानापासून संरक्षण करते. बदाम, सूर्यफूल बिया व मस्‍टर्ड ग्रीन्‍स यामध्‍ये ते असते.
व्हिटॅमिन सी: रोगप्रतिकाशक्‍ती व त्‍वचेच्‍या आरोग्‍यासाठी आवश्‍यक असून संत्री, लिंबू, आवळा आणि पेरू अशा लिंबूवर्गीय फळांमध्‍ये ते आढळते.
व्हिटॅमिन बी6: मेंदूचे आरोग्‍य व चयापचय क्रियेसाठी महत्त्वाचे असून केळी, बटाटे व सुर्यफूल बियांचा आहारात यासाठी समावेश करायला हवा.
व्हिटॅमिन बी 12: मज्‍जातंतू कार्य आणि लाल रक्‍तपेशी निर्मितीसाठी आवश्‍यक असून दुग्‍ध उत्‍पादने, अंडी, मासे व फोर्टिफाईड तृणधान्‍यांमध्‍ये असते.


खनिजे
आपल्या शरीरात काही खनिजांची देखील आवश्यकता असते. ज्यामुळे शरीर मजबूत राहते.

कॅल्शिअम: हाडांचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी हे घटक आवश्यक आहे. जे दूध, दही, नाचणी आणि तीळ यांमधून मिळते.
आयर्न : चयापचय क्रियांना सहाय करण्यासाठी लोह आवश्यक असून, ते पालक, मेथी, गुळ व डाळ यांमधून मिळते.
झिंक : रोगप्रतिकार कार्य आणि जखम बरी करण्‍यासाठी फायदेशीर आहे. झिंक भोपळ्याच्‍या बिया, चणे आणि बाजरी सारख्‍या संपूर्ण धान्‍यांमधून मिळते.