अनेक भागात सध्या रस्त्यांत खड्डा कि खड्डयांत रस्ता आहे हेच कळत नाही. रस्त्यांची खूपच दुरावस्था झाल्याचे चित्र आहे त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक भागात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत राहते. सध्या इचलकरंजी शहरात देखील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अनेक भागात मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. बौद्धविहार, महासत्ता चौक, रिंग रोड, थोरात चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता तात्काळ डाबरीकरण करावे या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्यावतीने खड्डयावर पुष्पहार अर्पण करुन अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी कृष्णापाणी योजनेचे वितरण नलिका टाकण्याचे काम 7 सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण रिंग रोड उकरून ठेवला आहे. सदरच्या न रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्याने आणि तोच रस्ता उकडल्यामुळे सदरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी व होऊन वाहनधारकांची रस्त्यावरून जाताना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदने, मोर्चे काढून ही प्रशासन गांधारीची भूमिका घेतल्यामुळे माजी नगरसेवक आब्राहम आवळे यांचे नेतृत्वाखाली सीईटीपी रोडवर लाल नगर, लाखे नगर, जाधव मळा परिसर, नारायण नगर, हाडके वसाहत, भारतीय नगर भागातील नागरिकांनी आंदोलन केले.
आंदोलनात दस्तगीर बागवान, वसीम कलावंत, स्टीफन आवळे, इस्माईल शेख, बादल देगडे, लियाकत पठाण, गंगाधर बंडीगणी, अमर आळंदे, खंडू कुरणे, साजिद मकानदार, मुबारक शेख, महादेव बनसोडे आदी कार्यकर्ते व भागातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.
