बांधकाम कामगार आणि भटक्या समाजाचे जातीच्या दाखल्याचे प्रश्न मार्गी लावू – आम. राहूल आवाडे

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराव पोवार यांच्या वतीने सुरु केलेले बांधकाम कामगार कार्यालय आणि हिरा – शाम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ सुरु केलेले वाचनालयाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात आम.आवाडे बोलत होते, बांधकाम कामगारांसाठी हे कार्यालय त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आधार ठरेल तर वाचनालय नव्या पिढीला ज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाण्यास मदत करेल. बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि भटक्या समाजाच्या जातीचे दाखले तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी मी शासन दरबारी प्रयत्नशील राहीन.

यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अनिल कदम यांनी केले. प्रास्ताविकात मुकूंद पोवार यांचा कार्यालय सुरु करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चांदणे यांनी केले. आभार संजय माने यांनी मानले. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, अमृत भोसले, अहमद मुजावर, रुबन आवळे, बाळासाहेब कलागते, रवी जावळे, राजू बोंद्रे, मोहन काळे, जयेश बुगड, रमेश पाटील, कोंडीबा दवडते, नरसिंह पारीक, भरत बोंगार्डे, सौ. सुमन पोवार, आक्काताई आवळे, ध्रुवती दळवाई, उर्मिला गायकवाड, अरुणा शहा, नौशाद जावळे, अरुण निंबाळकर, प्रथमेश पोवार यांच्यासह बांधकाम कामगार व भागातील नागरिक उपस्थित होते.