अलीकडे अघोरी विद्या जास्त प्रमाणात पहायला मिळत आहे. अनेक या अघोरी कृत्यांचा अनेक जण वाईट तर काही जण चांगल्या कामांसाठी वापरत असतात. परंतु हि अघोरी विद्यांमुळे अनेकांचे प्राण देखील गेलेले आहेत. आष्टा – नागाव रस्त्याजवळील वन विभागाच्या जागेत अघोरी पूजेचा संशयास्पद प्रकार घडल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. या घटनेत एका युवकाला स्त्रीप्रमाणे सजवून अघोरी कृत्य करण्यात आल्याची चर्चा आहे.या कृत्यामागे नरबळीचा हेतू होता की केवळ अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला, याबाबत माहिती मिळालेली नाही.
आष्टा – नागाव रोडजवळील वन विभागाच्या माळरानावर एका मंदिराच्या मागे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. एका युवकाला त्याच्या मित्राने स्त्रीप्रमाणे सजवून पाच वेळा होम-पूजा घडवून आणल्याचे बोलले जात आहे. संबंधित युवकाच्या भावाने हा प्रकार पाहून आपल्या भावाला त्या अघोरी कृत्यापासून दूर केल्याचे समजते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आष्टा पोलिसांनीही याचा तपास सुरू केला आहे. आष्टा शहर व परिसरात यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत.