विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्यावतीने दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली जिल्हा बँक संचालक तथा राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन वैभव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष देसाई, नेताजी कुरणे, दिनकरराव बसुगडे, प्रणव चौगुले, उदय यादव पाटील, नागनाथ दळवी, श्रीकांत सावंत, शंकर सावंत, माणिक शिंदे, इक्बाल पटेल, राम बसुगडे, सुरेश पाटील प्रकाश बसुगडे, विकास माळी उपस्थित होते. स्वागत संस्थेचे सचिव प्रकाश बसुगडे यांनी केले. प्रास्ताविक प्रणव चौगुले यांनी केले. यावेळी पूर्वी चौगुले, प्रतिकराज जगदाळे, आर्यन शिंदे, अर्थव देसाई, विराज माळी, अश्व सिद्ध, नितेश बापट, यश शिंदे, सत्यजित शिंदे, श्रावणी देसाई, राजवर्धन पाटील, आयान सन्दे यांचा तसेच १२ वी मध्ये अनुष्का शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार ईकबाल पटेल यांनी मानले.