खरसुंडीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी……

अनेक भागात मोकाट जनावरांचा त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतच आहे त्याचबरोबर अपघात देखील होतच आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्रीनाथ देवाच्या भक्तांनी देवास सोडलेल्या गाईनी शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या घटनेचे गांभीर्य प्रशासनास नसल्यामुळे शेतकरी संदीप पुजारी व स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत वारवार तहसीलदार, गटविकास अधिकारी, खरसुंडी ग्रामपंचात पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले होते. मात्र याबाबत अद्याप प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हणाले, खरसुंडीत देवास सोडलेली जनावरे रात्री अपरात्री शेतक-यांची गहू, हरभरा, ज्वारी, आंब्याच्या बागा, भाजीपाला ही पिके फस्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल शेतक-यांना पडला आहे. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.