आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते तारदाळ येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ ….

सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते, गटार यांसारख्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक भागाच्या विकासकामांसाठी शासनातर्फे निधी देखील मंजूर केले जात आहेत. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.

तारदाळ येथील विठ्ठल मंदिर ते शाहू नागरी पतसंस्था परिसरातील मुख्य रहदारीचा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी आमदार राहुल आवाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच सौ. पल्लवी पवार, यशवंत वाणी, चंद्रकांत तांबवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील, प्रवीण पाटील, भिमराव बन्ने, सचिन चौगुले, शिवकुमार विभुते, नयन कांबळे, अमित खोत, सूर्यकांत जाधव, रणजीत पोवार, अमित झेले, विनायक देसाई, गोगा बाणदार, सुरेश पवार, विजय चौगुले, योगेश वाणी, सुरेश नर्मदे यांच्यासह गावातील नागरिक म ोठ्या संख्येने उपस्थित होते.