मंगळवेढ्यात नवीन जिल्ह्याच्या पोष्टने संभ्रमावस्था, उलट सुलट चर्चा सुरू

सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्याचा समावेश असून सध्या जिल्हा प्रशासनावर होणारा कामाचा अतिरिक्त पाहता शासनाने काही नवीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव विचाराधिन ठेवला होता. त्या अनुषंगाने पंढरपूर जिल्हा व्हावा म्हणून गेली 40 वर्ष पासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तो प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. शासनाकडून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमातून आले. त्या अनुषंगाने मंगळवेढा तालुक्याचा समावेश नव्याने मानदेश नावाच्या जिल्ह्यात होणार असल्याचे छायाचित्रासह सोशल मीडियातून फिरू लागल्याने तालुक्यातील नागरिकांतून नवीन जिल्ह्यात होणाऱ्या समावेश याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.

मात्र प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण येत नसल्याने नागरिकांची संभ्रावस्था वाढत आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील नागरिकांना त्याच्या कामासाठी सोलापूरला जाण्यासाठी पडणारे अंतर हे जवळपास 100 किलोमीटर इतके आहे. मात्र, पूर्वी असलेल्या पंढरपूर जिल्ह्याच्या मागणीमध्ये मंगळवेढ्याचा समावेश केल्यास ते अंतर जवळपास 50 ते 60 किलोमीटर इतके होताना 40 किलोमीटर अंतराची बचत होऊन नागरिकांना होणारे गैरसोय थांबणार आहे.

मात्र, सध्या सोशल मीडियातून नव्याने होणाऱ्या जिल्ह्याच्या समावेशाबाद माणदेश नावाचा जिल्हा प्रास्तावित असून, त्यामध्ये दहिवडी, खानापूर, विटा, कवठेमहाकाळ, जत, मंगळवेढा, सांगोला, आटपाडी या दुष्काळी तालुक्याचा समावेश प्रस्तावित असून या जिल्ह्याचे मुख्यालय हे आटपाडी येथे होणार असल्याचे वृत्त सध्या माध्यमातून आले आहे.

शिवाय सोशल मीडियातून कशा पद्धतीचे छायाचित्र देखील व्हायरल झाल्यामुळे नव्याने होणारा माणदेश जिल्हा हा मंगळवेढेकरांच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे. त्यामुळे त्यांची अवस्था आगीतून उठून फुफूट्यात पडल्यासारखे होणार आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या जिल्ह्याबाबत मंगळवेढेकरांचे मत प्रशासनाने जाणून घ्यावे. शिवाय सोशल मीडिया मधून होत असलेल्या उलट सुलट चर्चाना पूर्णविराम द्यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांत होत आहे.