सध्या नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहेत. दुष्काळी भाग म्हणून अनेक तालुक्यांचा समावेश देखील पहायला मिळतो. दुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, माण, खटाव, फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो या दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची काही लोकांची कल्पना आहे.
त्याबाबत अजूनतरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. तसे झाले तर त्याचे स्वागत करु. पण हे करत असताना दुष्काळी भाग एकत्र करुन विकसीत जिल्हा तयार होईल असे समजायचे कारण नाही. सरकार जेव्हा नवीन जिल्ह्याबाबत विचार करेल तेव्हा सर्व गोष्टी समोर येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना स्पष्ट केले.
माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचा एक मेसेज सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरत आहे. या प्रश्नावर बोलताना ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले, वास्तविक असा प्रस्ताव समोर आलेला नाही. काही कल्पना लोकांच्या होत्या. यासंदर्भात काही लोक काम करत आहेत. दुष्काळी पटट्यात काम करणारी लोकं आहेत. दुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. या दुष्काळी पट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची लोकांची कल्पना आहे. त्याबाबत अजूनतरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.
